आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्यानंतर त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी खरचं ठाण्यातून निवडणूक लढवावी. ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं त्या म्हणाल्या. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गटाकडून ठाण्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरून शीतल म्हात्रेंनी टीका केली.
Category
🗞
News