दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाच्या चैत्र पोर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. जोतिबा मंदिरात पहाटोपासूनच लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. 'जोतिबाच्या नावानं चांगभल', 'केदार नाथाच्या नावानं चांगभल' अशा गजरात ही यात्रा सुरू आहे. आजचा जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं पहाटेपासुनच मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणामुळे संपूर्ण जोतिबा डोंगर परिसर गुलालानं न्हाऊन निघाला आहे.
Category
🗞
News