• 2 years ago
पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करणे आता अनिवार्य आहे. यासाठी १ हजार रुपयाचं शुल्क आकारलं जात आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हे शुल्क आकारल्याने देशातील जनतेवर ४४ हजार कोटी रुपयांचा दरोडा पडणार आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी व्हिडीओ शेअर करत सरकार सर्वसामान्यांकडून जिजीया कर आकारत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Category

🗞
News

Recommended