• 2 years ago
फेसबूक पोस्टवरून ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आता ठाकरे गट आक्रमक झाला असून ठोस कारवाईची मागणी केली जात आहे. आमदार मनिषा कायंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करत ४० आमदारांचे लाड आणखी किती वेळ पुरवणार?, असा सवालही केला आहे.

Category

🗞
News

Recommended