छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. 'चांगले लोक एकत्र येतात, त्याला वज्रमुठ म्हटले जाते पण, सत्तेसाठी हापापलेले लोक एकत्रित येत असल्याने ही व्रजझुठ आहे' अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.
Category
🗞
News