• last year
Chinchwad: राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर; भाजपाविरोधात निदर्शने करत जेलभरो आंदोलन

पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. पिंपरीच्या डांगे चौकात शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं. केंद्र आणि राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस चे नेते राहुल गांधींची खासदारकीचे सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहेत. लोकसभेत राहुल गांधी हे परखड प्रश्न मांडतात, त्यांच्या पदयात्रेला देखील मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपाने हे कटकारस्थान केल्याचा आरोप कैलास कदम यांनी केलाय.#congress #rahulgandhi #pimprichinchwad #chinchwad

रिपोर्टर: कृष्णा पांचाळ

Category

🗞
News

Recommended