• last year
Vijay Shivtare: 'संजय जगताप हा माठया'; विजय शिवतारेंची काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर टीका

पुणे महापालिकेमध्ये २०१७ साली ३४ गाव समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण त्यातील अनेक गावांना कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गाव वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या निर्णयायाचे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तर त्याच दरम्यान पुरंदर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे पक्षाचे आमदार संजय जगताप यांनी राजकीय स्वार्थापोटी निर्णय घेतला असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकार आणि विजय शिवतारे यांच्यावर केला होता त्याला शिवतारे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

रिपोर्टर सागर कासार

Category

🗞
News

Recommended