छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना काळाराम मंदिरातील महंतांनी वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास विरोध केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महंत सुधीरदास यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. आपण छत्रपती घराण्याचा अपमान केला नाही, काहीतरी गैरसमज झाला असावा. या प्रकरणी कोल्हापूरला जाऊन शाहू महाराजांची भेट घेऊ असंही ते म्हणाले.
Category
🗞
News