छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे या नाशिकमधील काळाराम मंदिर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास पुजाऱ्याने विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संयोगीताराजे यांनी सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली असता हा प्रकार समोर आला व यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून छत्रपती घराण्याला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही का?, असा सवालही केला आहे.
Category
🗞
News