पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघाचे आमदार रवी धंगेकर यांच्यावर बोलणे टाळले आहे. मी रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत होईल असं ऐकत आहे. कोण आहेत धंगेकर साधा एक नगरसेवक अस वक्तव्य भर सभेत चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून धंगेकर यांनी मीच धंगेकर असे मजेशीर उत्तर त्यांना दिले आहे. हाच प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी यावर बोलणे टाळले आहे. चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगतापांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ते पिंपळे गुरव येथील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Category
🗞
News