एलटीटीई प्रमुख व्ही. प्रभाकरन अजूनही जिवंत असल्याचा दावा करून पाझा नेदुमारनने एकच खळबळ उडवून दिली. नेदुमारन म्हणाले की, 'प्रभाकरन निरोगी आणि ठीक आहे आणि लवकरच तमिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करेल' त्यावर प्रतिक्रिया देताना टीपीडीकेचे सरचिटणीस रामकृष्णन म्हणाले की, 'ते आले तर ही सर्वात आनंदाची बातमी असेल'. २००९मध्ये युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाकरनला श्रीलंकन लष्कराने ठार मारल्याचे घोषित केले होते. श्रीलंका सरकारच्या घोषणेनंतर, एका मृतदेहाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.
Category
🗞
News