“भास्कर जाधवसोबत खडाजंगी करणं एवढं सोपं नाही”, Yogesh Kadam यांना चिमटा | Bhaskar Jadhav | Shivsena

  • 2 years ago
नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु असून आज या अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. सभागृहात आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे एकमेकांना भिडले. सभागृहात रत्नागिरीतील साकव संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा सुरु होती. यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी यावरून जाधव यांना प्रश्न विचारला. त्यावर जाधव म्हणाले की माझ्यासोबत खडाजंगी करणं एवढं सोपं नाही. तसंच सभागृहात नेमकं काय घडलं याबाबत देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

#BhaskarJadhav #YogeshKadam #Shivsena #Konkan #Khed #Dapoli #MNS #Shivsena #Nagpur #MaharashtraAssembly #WinterSession #Maharashtra #HWNews