‘कर्नाटकाचे मुख्यमंत्री रोज कानफटीत मारतात अन् Eknath Shinde गाल चोळत विधानभवनात जातात’- Sanjay Raut

  • last year
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात. आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. तसेच "मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमीन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही. तो जोर तो जोश आता दाखवा. देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील" असं म्हटलं आहे.

#sanjayraut #eknathshinde #basavrajbommai #amrutafadnavis #devendrafadnavis #bjp #shivsena #karnataka #maharashtrapolitics #mva #wintersession #hwnewsmarathi

Recommended