चंद्रपूरमध्ये आढळला भला मोठा अजगर; व्हिडीओ व्हायरल

  • 2 years ago
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मार्गावरील कोर्धा गावानजीक शैलेश जीवतोडे यांच्या शेतात भला मोठा अजगर आढळला. झेप संस्थेच्या सर्पमित्रांनी त्या अजगरला सुखरूप पकडून नागभीड वनविभाग कार्यालयात आणले. अजगराची लांबी १२ फूट असून वजन २४ किलो आहे. अजगराची माहिती मिळताच नागभीडच्या विविध शाळांतील विद्यार्थी पुस्तकात ज्यांच्याविषयी शिकतो ते अजगर प्रत्यक्षात कसे दिसते हे पाहण्यासाठी शिक्षकांसह वन विभागाच्या कार्यालयात आले होते, त्यानंतर अजगराला घोडाझरी जंगलात सोडण्यात आले.

Recommended