मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल

  • 2 years ago
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धिक्कार करणं गरजेचं होतं. मात्र, ते तोंड शिवून गप्प बसल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारकडून शिवप्रताप दिन साजरा करणं हे ढोंग असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. उदयनराजे यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले.

#SanjayRaut #EknathShinde #Pratapgad #UdayanRajeBhosale #DevendraFadnavis #Rajyapal #Karnataka #Bengaluru #Maharashtra #Shivsena #BJP