• 2 years ago
वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील तनपुरे मठात मंगळवारी (८ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत साने गुरुजी सत्याग्रह स्मारकाचं लोकार्पण झालं. शरद पवार यांनी या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देत साने गुरुजींच्या कामाचं कौतुक केलं. तसेच स्वतः ब्राह्मण जातीतून आले असतानाही साने गुरुजींनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन सत्याग्रह करत वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार पुढे नेला, असं मत व्यक्त केलं. या पार्श्वभूमीवर साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाचा इतिहास काय, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्याचे सामाजिक पडसाद काय पडले, या सत्याग्रह स्मारकाची निर्मिती कशी झाली, त्याचं महत्त्व काय अशा अनेक मुद्द्यांचा हा खास आढावा.

#saneguruji #pandharpur #Satyagraha #smarak

Category

🗞
News

Recommended