राज्यात सीबीआयची थेट एन्ट्री; तपसासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही

  • 2 years ago
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीबीआयला तपासासाठी शासनातर्फे पुन्हा 'सामान्य संमती' दिली आहे. या निर्णयामुळे केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयला आता राज्यातील एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. यापूर्वी महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारला माहिती देऊन राज्य सरकारच्या परवानगीनंतरच सीबीआय तपास सुरू करू शकत होती. मात्र यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीची गरज भासणार नाही.

Recommended