नवरी घर सोडते तसा ‘वर्षा’ बंगला सोडला; भुमरेंची ठाकरेंवर जोरदार टीका| Sandipan Bhumare| Thackeray

  • 2 years ago
औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांचा शिवसेना (shivsena) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरील (uddhav thackeray) हल्ला सुरूच आहे. अमरावतीत एका सभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं यांनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं. आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जायचो. तेव्हा मास्क लावून असत. आता सरकार गेलं आणि मास्कही गेला. खुर्ची गेली आणि कोरोनाही गेला. ठाकरे हे केवळ टीव्हीवर दिसायचे. टीव्ही बंद केला तर ठाकरेही दिसत नसायचे, असा जोरदार हल्ला संदीपान भुमरे यांनी चढवला.

#SandeepanBhumare #AbdulSattar #UddhavThackeray #AdityaThackeray #Varsha #Maharashtra #Defence #Expo #Shivsena #BJP #HWNews

Recommended