ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी घेतली का घेतली विश्वजित कदम यांची भेट?| CM Eknath Shinde

  • 2 years ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या सांत्वणासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथे आले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच सांगली दौरा होता. मात्र ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजितकदम यांची भेट घेतली. सांगली-मिरज मार्गावर असणाऱ्या भारती हॉस्पिटल मध्ये ही भेट संपन्न झाली. यावेळी बंद खोलीमध्ये दोघांत चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी भारती हॉस्पिटल मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विश्वजीत कदम यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. मुख्यमंत्री शिंदे हे सांगली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी ही भेट राजकीय नसून केवळ मित्रत्वापोटी आणि कदम घराण्याशी शिंदे यांचे असणारे घनिष्ठ संबंध यामुळे स्वतः मुख्यमंत्री भेटायला आले असल्याचे सांगून यावेळी त्यांना काँग्रेस तर्फे विविध मागण्यांचे निवेदन दिल्याची माहिती ही विश्वजीत कदम यांनी यावेळी दिली.

#EknathShinde #Shivsena #DevendraFadnavis #BJP #VishwajeetKadam #Maharashtra #HWNews

Recommended