कुर्ल्यात भोंगे लावून हनुमान चालीसेचे पठण, राजकारण तापलं

  • 2 years ago
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत मशिदीवरील भोंग्यावर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. आज देखील मुंबईतील कुर्ला परिसरात मनसे सैनिकांनी भोंगे लावून हनुमान चालीसा लावल्याने कुर्ल्यात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. मनसे सैनिकांना राज ठाकरेंनी दिलेले आदेश यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

Recommended