मुस्लिम समाज फक्त निवडणुकांपुरताच आहे का?; जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाला सवाल

  • 2 years ago
खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. मुस्लिम समाजाच्या मतांमुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी निवडूण आले आहेत, असं ते म्हणाले आहेत. मुस्लिम समाज फक्त निवडणुकांपुरताच आहे का?, असा प्रश्न देखील जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारला आहे. ९३ हजार एकर वफ्फ बोर्डाची जमीन राजकारण्यांनी गिळंकृत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे तिरंगा मोर्चा घेऊन मुंबईत येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकारांशी साधलेल्या संवादात ते बोलत होते.

Recommended