शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यात निधन झालं. याबद्दलची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने दिली. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी २९ जुलै रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. यावेळी बाबासाहेबांनी “आणखीन दोन तीन वर्षे मिळाली तर…” असं म्हणत एक इच्छा व्यक्त केलेली.
Category
🗞
News