आधीचं कर्जबाजारी त्यात 'रशियन' भिकारी | रोचक माहिती मराठी भाषे मध्ये | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
भारत हा गरिबांचा श्रीमंत देश आहे. भारतीय संस्कृतीत दान-धर्माला अधिक महत्व आहे, त्यामुळे भिकारी हे भारतीयांसाठी नवे नाहीत. पण रशियातील भिकारी असेल तर...
इव्हेंजिलीयन हा तरुण भारत भ्रमंतीसाठी आला होता. पण भारतात आल्यानंतर त्याचा ATM पिन लॉक झाला आणि खर्चा करता त्याच्याकडे पैसे नव्हते. पिन लॉकिंग मूळे त्याला पैसे काढता येईना. शेवटी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने कांचीपुरम येथील सुब्रह्मण्यम स्वामीं मंदिर बाहेर भीक मागण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी पोलिसांना कळवलं, पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या लक्षात आले आर्थिक परिस्तिथीमूळे त्याच्यावर भिक मागण्याची वेळ आली आहे. अनेकांनी या संदर्भात ट्विट केल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं लक्ष वेधलं गेलं. "रशिया आमचा जुना मित्र आहे, चेन्नई मधील अधिकारी सर्वतोपरी मदत करतील" असं ट्विट करीत स्वराज यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.
इव्हेंजिलीयन 24 सप्टेंबर ला भारतात आला होता.

Recommended