गुजरात मध्ये शिवसेना ज़ोरात। BJP च्या अडचणीत वाढ | Shiv Sena In Gujrat | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
गुजरातमध्ये शिवसेनेने 40 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे.गुजरात म्हणजे भारतीय जनता पार्टी चा गढ म्हंटलं जातो त्यात आता शिवसेना सुरुंग लावण्याच्या तयारीत दिसते आहे .. शिवसेनेना गुजरातमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. याबाबत शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.गुजरातमध्ये काँग्रेसच्या आव्हानामुळे हैराण झालेल्या भाजपसमोर आता शिवसेनेचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असे दिसते आहे शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे हिंदूत्त्ववादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे ..आणि त्याचे नुकसान भारतीय जनता पार्टी ला होईल ह्याची भीती वर्तवली जात आहे..शिवसेनेच्या ह्या राजकीय खेळी मुळे सत्ते चे दान कोणाच्या बाजूने पडते ते बघायचे आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended