जेव्हा पोलिस ही हात टेकतात | पोलिस चा फनी वीडियो | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
जेव्हा पोलिस ही हात टेकतात.

दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट घालणं सुरक्षेच्या हेतूने कितपत महत्वाचे हे वाहतूक विभाग सांगून सांगून थकले आहे. दुचाकी चालवणाऱ्या व त्यांच्या सोबत सहप्रवासी असणाऱ्या प्रवाश्यांनाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे. या नियमाला दुर्लक्षित करणाऱ्या सोबत काय होत ? हे माहित असूनही लोक त्याकडे कानाडोळा करतात.
आंध्र प्रदेशमधले पोलीस निरिक्षक बी शुभ कुमार रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती देखील कुटुंबासोबत उपस्थित होता. शुभ कुमार यांचे व्याख्यान ऐकून त्याच्यावर काडी मात्र परिणाम झाला नाही. आपल्या दोन मुलांना दुचाकीच्या टाकीवर आणि मागे पत्नी आणि आई असं पाच जणांचं कुटुंब घेऊन तो दुचाकीवरून चालला होता. एकानेही हेल्मेट घातलं नव्हतं. शुभ यांनी त्याला वाटेत अडवले. रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीवर एवढं समजून सांगितल्यानंतरही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही हे पाहून शेवटी हतबल होऊन कुमार यांनी त्याच्यापुढे हात टेकले.

Recommended