सटाण्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलीसांतर्फे दंडुक्याचा प्रसाद | Sakal Media | Nashik |

  • 3 years ago
नाशिक : सटाणा शहरात पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल गवई, देवेंद्र शिंदे, किरणा पाटील यांनी विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना शहरात प्रवेश दिला जात नाही.
#sakalmedia #nashik #police #lockdown #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended