• 4 years ago
कोल्हापूर : बकुळ ही वनस्पती सदाहरित असून फुलांचा सुगंध हा स्वर्गीय सुख देणारा आहे. पूर्वी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी हे वृक्ष दिसत असत. आता मात्र बकुळीच्या वृक्षांची संख्या कमी झालेली दिसते. महापालिकेच्या उद्यानात, वैयक्तिक बागेत, घरासमोर, मंदिराच्या बाजूला कुठेतरी तो दिसतो. असे म्हणतात की, श्रीकृष्णाला ही फुले खूप आवडत असत. बकुळीच्या फुलांचा सडा प्रात:काळी खाली पडतो. तो वेचण्यासाठी मुली येतात. फुले घेऊन बकुळीचा गजरा तयार करतात. पूर्वी श्री अंबाबाई मंदिराच्या बाजूला जे फुलवाले दिसतात. तिथे हा गजरा दिसत असे. आता हा गजरा अलिकडच्या काळात दिसत नाही. बकुळीचे फुल पानात, डायरीमध्ये ठेवले तर त्याचा सुगंध कितीतरी वर्षे तसाच टिकून राहतो. कोकणात मोठ्या प्रमाणात बकुळ आढळतो. पश्‍चिम घाटातील जंगलात हा खूप दिसतो. असा हा बकुळ प्रत्येकाने आपल्या दारी लावला पाहिजे. सुंगध घेतला पाहिजे. प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर बकुळीच्या वृक्षाबद्दल काय सांगत आहेत, ते पाहा. बकुळ जरुर लावा.

रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ : नितीन जाधव

Category

🗞
News

Recommended