वर्धेत चार दिवसांचा लॉकडाउन

  • 3 years ago
वर्धा : पिपरी (मेघे) येथे झालेल्या लग्नाने प्रशासनाची झोप उडविली आहे. या लग्नातील नवरदेवच कोरोनाबाधित असल्याचो पुढे आल्याने अख्खे वऱ्हाडी पॉझिटिव्ह येते की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अहवालात नवरदेवाची आई, नवरी आणि या लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी इतवारा परिसरातील दोघे पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला आता धडकी भरली आहे. यामुळेच सोमवारपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात केवळ वैद्यकीय सेवा आणि औषधी दुकाने तेवढी सुरू राहणार आहेत.

Category

🗞
News

Recommended