• 3 years ago
माउलींच्या पालखीचे पुण्यात आगमन
पुणे - माउलींच्या पालखीचा पहिला दुपारचा विसावा मंगळवारी फुलेनगर येथील दत्त मंदिरात झाला. या वेळी परंपरेप्रमाणे सावंत कुटुंबीयांनी माउलींना नैवेद्य दाखविला. तासाभराच्या विसाव्यानंतर पालखीचे पुण्याकडे प्रस्थान झाले.
दुपारी बारा वाजता पुणे महापालिकेच्या हद्दीत पालखीचे आगमन झाले. या वेळी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी पालखीचे स्वागत केले. पादुकांचे दर्शन घेण्यासाठी दिघी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात जवान पालखीची आतुरतेने वाट पाहत होते. काही जवान वारकऱ्यांना अन्नदान, पिण्याचे पाणी वाटप करताना दिसत होते. टाटा कम्युनिकेशन कंपनीने वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या नळकोंडाळ्याची सोय केली होती. दिघी ते बोपखेल फाटा दरम्यानचा अरुंद रस्ता, तर पुढे महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वारकऱ्यांना चालताना अडचणी येत होत्या.

Category

🗞
News

Recommended