स्त्रियांनो, नका होऊ द्या भावनिक कोंडमारा

  • 3 years ago
नागपूर : लॉकडाउनमुळे नातेसंबंधात होत असलेली भावनिक चलबिचल प्रकर्षाने जाणवते आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना नेहमीच भावनिक कोंडमारा सहन करावा लागला आहे. कालपरत्वे त्यात थोडा फरक पडला, अधिकार, भौतिक स्वतंत्र मिळाले पण परिस्थिती थोडी अधिक तशीच आहे. शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी होणारा बदल आत्मसात करण्याचे आणि मानसिक कोंडमारा होऊ न देण्याचे आवाहन महिलांना केले आहे. मानसिक ताण येऊ नये यासाठी कामांचे नियोजन करा, वेळापत्रक तयार करा, घरातील ज्येष्ठांना व मुलांना कामाची कल्पना द्या. सकारात्मक विचार करा, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी केले आहे.

#Helt #Fitness #Timetable #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Category

🗞
News

Recommended