कोरोनाचे आधुनिक भारुड

  • 3 years ago
अकोला : शहरातील कलावंतांनी एकत्रित येऊन कोरोना विषयी जाणीव जागृती व्हावी म्हणून 'कोरोनाचे आधुनिक भारुड' हा आगळावेगळा कार्यक्रम ऑनलाइन सादर केला आहे. सर्व कलावंतांनी आपल्या घरी शूटिंग करून तंत्रज्ञानाचा वापर करून हा सुंदर कार्यक्रम तयार केला. कोरोनाच्या बाबतीत लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा म्हणून सगळे कलावंत एकत्र आलो, असे कार्यक्रमाचे निर्माता वल्लभ नारे यांनी सांगितले. या भारूडांमध्ये स्निग्धा देशमुख, कबीर जानभोर, नंदकिशोर डंबाळे, श्रावणी खुमकर, विजय वाहोकार, अतुल डोंगरे या कलावंतांचा सहभाग आहे. संगीत, गीत, नृत्य, भजन, भारूड या सर्वांचा सहज वापर करीत अतिशय मार्मिकपणे हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांची या कार्यक्रमाला खूप वाहावा मिळत आहे.
#awairness #corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews#bharud #awairness #corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews

Category

🗞
News

Recommended