कोरोना इफेक्ट : परळीत कोंबड्या फुकट.!

  • 3 years ago
परळी (जि. बीड) : कोरोना विषाणूच्या प्रसाराचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. येथील वसंत नगर  तांडा  येथील लहू चव्हाण यांनी कर्ज घेऊन उभारलेल्या पोल्ट्रीची पहिलीच बॅच विक्रीसारखी मोठी झाली. परंतु, कोरोनाचा विषाणू आला आणि कोंबड्या कोणीही विकत घेईत. या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची त्यांनी प्रशासनाला परवानगीही मागितली. परंतु, कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सोमवारी १२ हजार कोंबड्या फुकट वाटल्या. कोंबड्या नेण्यासाठी अशी झुंबड उडाली.

esakal.com

#coronavirus #covid19 #parli #beed #sakalvideos #marathivideos #viralvideos #maharashtra #hens #chicken #coronavirusoutbreak #Sakal #SakalNews #ViralNews #Viral

Category

🗞
News

Recommended