Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/20/2019
अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी केले होते, त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर

सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भिडे यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. तळोकार पत्र फेसबुकवर शेअर केले आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ ही मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या भूपृष्ठापासून केवळ २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला. त्यामुळे सर्वच भारतीय हळहळले. अमेरिकेने एकादशीच्या

दिवशी चांद्रयान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य भिडेंनी केला होता. भिडे यांना वक्तव्यावरुन आता त्यांना इस्रोचे प्रमुख बनवण्याची मागणी राष्ट्रवादीने पंतप्रधानांकडे केली आहे. तळोकार यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय

‘अध्यात्मिक गुरु श्री मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याबाबत मागणी,’ असा आहे.

#sambhajibhide #ISRO #breakingnews #maharashtranews #marathinews #amolkolhe #latur #news

Category

🗞
News

Recommended