Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/20/2019
विदर्भात पूरस्थिती, सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील बहुतांश भागांत पूरस्थिती कायम आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढते आहे.
मध्यप्रदेशात तुफान पाऊस... संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आले... वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ... अनेक मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद... गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दोन मिटरने उघडण्यात आले...

महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला... शेकडो प्रवासी सिमावर्ती गावात अडकले.... जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणूक
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती... पाटील म्हणाले, “राज्यात विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील”..

भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील जागांचा आढावा घेण्यात आला. जागा वाटपाच्या बोलणीचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
#maharashtranews #topnews #headlines #flood #vidarbh #weatherupdates #rain

Category

🗞
News

Recommended