• 5 years ago
भारत अंतराळात इतिहास रचण्याचा केवळ 2 पाऊल मागे राहिला. चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर उंचीवर असताना लँडिंगच्या केवळ 69 सेकंदापूर्वी चांद्रयान-2 चा पृथ्वीशी संपर्क तुटला.

चांद्रयान- 2 फायनल ब्रेकिंग दरम्यान रस्ता भरकटला. इस्त्रोचे हे मिशन अयशस्वी ठरले नाही, कारण आशा अजून देखील बाकी आहे.

978 कोटी रुपये खर्च करून केलेलं या चांद्रयान-2 मिशनचं सर्व काही संपलं नाही. ऑर्बिटरमध्ये लागलेले 8 पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाचा चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करतील.

ज्या ऑर्बिटरने लँडर पृथक झाले होते, ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 119 किमी ते 127 किमी उंचीवर फिरत आहे. जोपर्यंत लँडर विक्रम निष्क्रिय घोषित होत नाही तोपर्यंत इस्त्रो दुसर्‍यांदा संपर्क करण्याचा प्रयत्न करेल.

चांद्रयान-2 ऑर्बिटर अजून देखील चंद्राची यशस्वीरीत्या परिक्रमा करत आहे. ऑर्बिटरमुळे चांद्रयान- 2 मोहीम ही पुढील किमान एक वर्ष सुरुच रहाणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो इस्त्रोला पाठवू शकतो.
#Chandrayaan2Landing #Chandrayaan2 #Bengaluru #ISRO #news #Moon #VikramLander #MoonMission #KSivan

Category

🗞
News

Recommended