• 5 years ago
मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेसहित हार्बर मार्गावरील वाहतूकही उशिराने सुरु आहे. दरम्यान मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढल्यामुळे लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे.मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात पाऊस सुरु आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासह मुंबई आणि परिसरात वरुणराजाचंही पुनरागमन झालेलं आहे.नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वसई-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. चर्चगेट ते वसईपर्यंत रेल्वे वाहतूक 30 मिनिटे उशिराने सुरु आहे.
#mumbairain #punenews #maharashtranews #marathinews #topheadline

Category

🗞
News

Recommended