स्पर्धा परीक्षांच्या खडतर स्पर्धेत यश मिळवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान व्यक्तिमत्व विकासापासून ते ज्ञानसंपादनापर्यंत अनेक गोष्टी घडत असतानाच या स्पर्धेमुळे (मुसंडी टीझर) अनेक सामाजिक प्रश्नही उपस्थित होतात. यावर भाष्य करताना, सोनई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंदी’ या मराठी चित्रपटाचा धमाकेदार टीझर ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Category
🎥
Short film