युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकामधल्या भारत-पाकिस्तान सामन्यांचं मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी भारतातल्या क्रिकेटरसिकांना मिळणार आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातल्या सामन्यांचं सिनेपोलीसच्या थिएटर्समधून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सिनेपोलीसनं आशियाई क्रिकेट कौन्सिलशी खास करार केला असून, करारानुसार ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातल्या सहा सामन्यांचं सिनेपोलीस थिएटर्समधून थेट प्रक्षेपण करण्यात येईल. या सहा सामन्यांमध्ये रविवारच्या भारत-पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. सिनेपोलीसइंडिया डॉट कॉम, पेटीएम आणि बुकमायशोवर या सामन्यांची तिकीटं आरक्षित करता येतील.
Category
🗞
News