पुणे: अजित पवारांनी मुलीसमोर जोडले हात; कारण...

  • 2 years ago
पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ – देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी स्टॉलला भेट देत शेणापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींसह अन्य वस्तू पाहिल्या. त्यानंतर तिथे असलेल्या दोन तरुणींकडे अजित पवारांनी विचारपूस केली. “तू कुठली, तुम्हाला मेरिटवर प्रवेश मिळाला का?" अशी विचारणा त्यांनी केल्यावर तरुणीने दिलेलं उत्तर ऐकून अजित पवारांनी तरुणीसमोर हात जोडले.

#AjitPawar #pune ##exhibition

Recommended