ममता बॅनर्जींसोबत संवाद साधल्यानंतर स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढा का आहेत चर्चेत?

  • 3 years ago
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. ३० नोव्हेंबर रोजी त्या मुंबईत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी सिव्हिल सोसायटीमधील सदस्यांशी संवाद साधला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतील जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, रिचा चड्ढा यांनी वाय. बी. सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

#mamtabanerjee #swarabhaskar #richachaddha

Recommended