Satara ; पुढाऱ्यांसह सर्वचजण निवडणुकीत दंग, जिल्हाधिकारी शेतात मग्न ; पाहा व्हिडीओ

  • 3 years ago
Satara ; पुढाऱ्यांसह सर्वचजण निवडणुकीत दंग, जिल्हाधिकारी शेतात मग्न ; पाहा व्हिडीओ
दहिवडी : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या निकालात सर्वचजण दंग असताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह मात्र माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेले विविध प्रयोग पाहण्यात दंग होते. सकाळी आठ ते दुपारी चार एवढा वेळ त्यांनी माण मध्ये दिला. या दरम्यान त्यांनी उकिर्डे येथे सेवानिवृत्त सनदी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी फुलवलेला मळा पाहिला. त्यानंतर सुरुपखानवाडी येथे वृक्षारोपण केले. नंतर दहिवडी काॅलेज येथे मतदार नोंदणी कार्यक्रमाला भेट दिली. दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बेसबॉल संघाला शुभेच्छा दिल्या. प्रांत कार्यालयासमोरील हरित वसुंधरा उपक्रमाची पाहणी केली. बिदाल येथील प्रगतशील शेतकरी बुवासाहेब नांगरे यांनी मल्चिंगवर केलेला कांदा पाहिला. मार्डी येथील निर्यातक्षम डाळिंब पाहून शेतकऱ्यांचे कौतुक केले. तर एच.डी.एफ.सी बँकेच्या सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लोकार्पण व उद्घाटन केले. (रुपेश कदम : सकाळ वृत्तसेवा)
#satara #collectorshekharshingh #visitedfarmers #politicalengangement&collectorbusyinfarmers #bignews #esakal #sakalmedia