Satara ; शेखर गोरे यांनी कोणावर धरला नेम अन कोणाचा केला गेम ; पाहा व्हिडीओ

  • 3 years ago
Satara ; शेखर गोरे यांनी कोणावर धरला नेम अन कोणाचा केला गेम ; पाहा व्हिडीओ
दहिवडी, ता. २३ : सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर वेगवेगळ्या शैलीत जल्लोष केला.
गेली कित्येक दिवस हुलकावणी देणारा विजय आज शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्त अनुभवण्यास मिळाला. त्यामुळे सर्वचजण फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बेभान झाले होते.
या मिरवणुकी दरम्यान शेखर गोरे यांनी विविध प्रकारच्या पोज दिल्या. एकदा त्यांनी दंड थोपटून पहिलवानकीची पोझ दिल्या. तर परत त्यांनी हाताने नेम धरुन बंदुकीतून गोळी झाडल्यासारखे हावभाव केले. त्यामुळे त्यांनी हा नेम कोणावर धरला व कोणाचा गेम केला याची चर्चा सुरु झाली आहे.
व्हिडीओ : रूपेश कदम
#shekhargore #satarabankelection #procession #bignews #esakal #sakalmedia