काळ्या बिबट्याचे पिल्लू अडकले पाण्याच्या टाकीत; वनविभागाने केली सुखरूप सुटका

  • 3 years ago
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याच्या टाकीत दुर्मिळ काळ्या बिबट्या आढळला आहे. एका बागेमधील पाणाच्या टाकीत दोन दिवसांपासून काळ्या बिबट्याचे पिल्लू अडकून पडले होते. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याची सुखरूप सुटका केली. दुर्मिळ काळ्या बिबट्याचे हे पिल्लू नर असून ते साधारण एक ते सव्वा वर्षाचे आहे. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे यांनी सांगितलं.

Recommended