Lokmat News | देव तारी त्याला कोण मारी ? 11 दिवसांनंतर शव पेटीतून जिवंत बाहेर | The Tragedy of Life

  • 3 years ago
ब्राझीलच्या रोसनगेला लमीडा डोस सैंटोस ह्या ३७ वर्षीय ब्राझिलच्या महिले बाबत एक विचित्र घटना घडली आहे.रोसनगेला यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. २८ जानेवारी रोजी डॉक्टरांनी रोसनगेला यांना मृत घोषित केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जमिनीत दफन करण्यात आलं होतं. काही दिवसांनी रोसनगेला यांना ज्या ठिकाणी दफन केलं होतं तिथे नतालिया सिल्वा या महिलेला जमिनीतून किंचाळण्याचा आवाज येत होता. नतालिया यांनी याबाबत परिसरातील लोकांना कळवलं.रोसनगेला यांच्या नातेवाईकांनी जमिनीमध्ये पुरण्यात आलेली शवपेटी खोदून बाहेर काढली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शवपेटीमधून जिवंत रोसनगेलाच बाहेर आल्या. रोसनगेला यांनी बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. त्यांची नखे अक्षरश: उखडली होती,


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended