एका उच्चशिक्षित इंजिनियरची आत्महत्या, त्याला जाणून घ्यायचे होते मृत्यूनंतरचे रहस्य | Lokmat News

  • 3 years ago
बुराडी येथील २५ वर्षीय इंजिनियर नवदीप याने मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केली आहे. 
नवदीपकडे 'लाईफ आफ्टर डेथ' नावाचे पुस्तक, लॅपटॉप आणि मोबाईल सापडला आहे. नवदीपच्या दोन पानी सुसाईड नोटमध्येही मृत्यूनंतरचे सत्य जाणून घेण्यासाठी  आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.  
नवदीप निराशेमध्ये होता. तो अनेक दिवसांपासून आत्महत्या करण्याचे विविध मार्ग शोधत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याने अनेकदा मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे लिहले होते. मुलाची अवस्थ्या पाहून नवदीपची आईदेखील चिंतेमध्ये होती. जागेत बदल हवा म्हणून नवदीपसह त्याची आई बुराडीमध्ये रहायला आली होती.  नवदीपने सोमवारी रात्री आत्महत्या केली.नवदीपने कोलकत्त्यामधून इंजि निअरिंगचे शिक्षण घेऊन दीड वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी केली. मागील वर्षी म्हणजे २०१७ स्वीडन हून साली तो भारतामध्ये परतला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended