संजय लीला बंसाली ह्यांची वादातूनच प्रेरणा | Sanajy Bhansali New Controversy | लोकमत न्यूज़

  • 3 years ago
संजय लीला भन्साळी एक वादग्रस्त दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. वाद आणि संजय यंचे अनोखेनाते आहे. त्यांचा कोणताही चित्रपट येत असेल तर त्या आधीच वाद व्हायला सुरवात होते. आता सुद्धात्यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे आणि त्या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर होत आहे. ह्या चित्रपटाचे सध्या पोस्ट प्रोडक्शन सुरु आहे. परंतु संजय लीला भन्साळीवर ह्या वादांमुळे कुठलाही फरक पडत नाही. ते या वादांना नकारात्मकपणे घेत नाहीत, या बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले कि माझ्या कुठल्याही चित्रपटाचे चित्रीकरण सोपे
नसते जेव्हा मी माझा पहिला चित्रपट “ खामोशी : द म्युझिकल” चे दिग्दर्शन केले होते. तेव्हा सुद्धा मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. हाच संघर्ष मला नवनवीन चित्रपट तयार करण्याची ताकद देत असतो.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended