नाणार वरुन शिवसेना-भाजपमध्ये वादंग

  • 3 years ago
नाणार ग्रीन रिफायनरी वरून जोरदार वादंग सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी देवगड शिवसेनेच्या प्रवेशाच्या दरम्यान राऊत यांनी भाजपचे प्रमोद जठार यांच्या एक व्यक्तव्य केलं होतं की, गुजरात आणि राजस्थान मधील दलालांनी ज्या जमिनी घेतल्या आहेत, त्या जठार यांच्या माध्यमातून घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी खासदार विनायक राऊत यांना २ टॉयलेट सीएसआर फंडातून दिले नाहीत, म्हणून ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करीत आहेत असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे. तसेच रिफायनरी प्रकल्पात दलाली असल्याचे सिद्ध करा, अन्यथा भर चौकात माफी मागा, असेही प्रमोद जठार म्हणाले आहेत