शिवसेनिकांनी केले शोले स्टाईल आंदोलन

  • 3 years ago
अमृत योजनेत होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शिवसेनिकांनी केले आंदोलन

अकोला : मनपाच्या अमृत योजनेच्या माध्य मातून गत अडीच वर्षांपासून प्र क्र 18 मध्ये पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी पाइप लाईन खोदून ठेवण्यात आली असून या कामात भ्रष्ट्राचार होत असल्याची तक्रार वारण वार देऊन सुद्धा कंत्राटदारांवर कारवाई होत नाही .या परिसरातील कंत्राटदार योग्य काम करीत नसून एस्टीमेट प्रमाणे योजनेचे काम योग्य होत नसल्यामुळे प्र क्र 18 सोबत शहरातील लोकांची पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. मनपा प्रशासनाच्या या नाकर्ते पणा विरुद्ध शिवसेनिकांनी व परिसरातील नागरिक शुक्रवारी शिवसेना वसाहत मधील मोबाईल टॉवर वर चढून शोले टाईप आंदोलन राबवून आपला निषेध व्यक्त केला.या कामाच्या कंत्राटदाराने परिसरात नुसती पाण्याची पाईप लाईन खोदून ठेवली आहे.तसेच अंदाजपत्रक प्रमाणे काम होईनासे झाले आहे.मनपा प्रशासनास या संदर्भात वारंवार निवेदने देवून कामांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती .मात्र अद्याप पर्यंत चौकशी न होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.शासनाने सर्वाना हक्काचे पाणी मिळावे म्हणून इतकी चांगली अमृत योजना राबवत आहे पण अकोला शहरातील भ्रष्टाचार पाहता दुःख होत आहे महानगर पालिकेतील सत्ताधारी हे जनतेचे सेवक नसून कंत्राटदारांचे सेवक असल्या सारखे वागत आहे
जनतेचा पैसा योग्य प्रकारें खर्ची व्हावा म्हणून नागरिकांनी परिसरातील नगरसेविका सौ.सपना अश्विन नवले,अश्विन उद्धवराव नवले यांच्या पुढाकाराने आयोजित या अभिनव आंदोलनात सहभाग घेतला.अश्विन नवले यांच्या सोबत परिसरातील काही नागरिकांनी उंच मोबाईल टॉवरवर चढून जो पर्यंत प्रलंबित अमृत योजना कार्यान्वित होत नाही तो पर्यंत उतरणार नसल्याचा इशारा प्रशासनास दिला.मात्र ज्येष्ठ नगरसेवक राजेश मिश्रा यांनी मध्यस्थी करून मनपा अधिकाऱ्यांना सात दिवसात ही योजना सुरळीत करण्याचा इशारा दिला.यावेळी गजानन चव्हाण उपस्थित होते.