विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तरुणांचा "माय स्कूल-माय स्टुडंट' ग्रुप

  • 3 years ago
भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्‍याती लसोरणा गावात पहिली ते चौथीची शाळा आहे. शाळेचा पट 32 आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी गावातीलच उच्च शिक्षित तरुणांच्या मदतीने 5-5 विद्यार्थ्यांचे गट करून रोज शिक्षण देणे सुरू आहे. हे सर्व तरुण विना मानधन काम करीत आहेत. शाळेचा "माय स्कूल-माय स्टुडंट' नावाचा पालक, शिक्षक व गावातील नवतरुण यांचा व्हॉट्‌स ग्रुप कार्यान्वित आहे. शाळेतील शिक्षक या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर नियमित गृहपाठ देतात. हे गृहपाठ व इतर अध्यापन करवून घेण्याचे काम गावातील उच्च शिक्षित तरुण करीत आहे. (व्हिडिओ : विजय राऊत)