नागपूर व विदर्भातील शनिवारच्या (ता. १३) महत्त्वाच्या घडामोडी

  • 3 years ago
- नागपूर : पोलिस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी मैत्री करून अनेकांना लाखोंनी गंडा घालणारी तसेच "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखली जाणारी प्रीती दासला शनिवारी (ता. 13) पाचपावली पोलिसांनी अटक केली.

- नागपूर : गेली दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे शुक्रवारी शहराच्या विविध भागांत तसेच ग्रामीण भागातील 18 रुग्ण आढळून आले होते. शनिवारी यात अकरा रुग्णांची भर पडली.

- अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरीवरून आष्टीकडे जाणाऱ्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर : ओबीसींना 19 टक्के आरक्षण असले तरी राज्यातील आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांत ही टक्केवारी 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर 6 टक्केच आहे. ओबीसी वर्गातील असंतोष आणि कायद्याची होत असलेली पायमल्ली लक्षात घेता नव्याने उपाययोजना सूचविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha